नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक झाल्यानंतर पारंपारीक पोलीस काम करण्यासोबत काही तरी वेगळे करून एक नवीन आदर्श निर्माण करण्याची इच्छा असल्याचे अबिनाशकुमार यांनी सांगितले.
काल दि.10 ऑगस्ट रोजी बोलवेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार संघटनेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. मी नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दीड वर्षापासून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात काम केलेले आहे. त्यामुळे माझ्यामध्ये भरपूर काही उर्जा त्यांनी दिलेली आहे. सध्या नुतन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आहेत. त्यांच्यासोबत मी या अगोदर कधी काम केलेले नाही. पण त्यांची ख्याती मला पुर्णपणे माहित आहे. त्यांच्या मार्गदर्शनात काम करतांना मला भरपूर काही नाविण्यपुर्ण करण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा मी भरपूर उपयोग करणार आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असतात त्यामध्ये अवैध धंदे बंद करणार आणि ते करून दाखवणार. हे सांगतांना त्यांनी एका प्रकारे अवैध धंदे करणाऱ्यांना निर्वाणीचा इशाराच दिला आहे. त्याचा पहिला खेळ त्यांची पत्रकार परिषद सुरू असतांनाच पोलीसांनी केला आणि जिल्ह्याभरात 95 अवैध दारु विक्रेत्यांवर 93 गुन्हे दाखल केले. पोलीसांचे काम हे चौकटीत असते. त्या चौकटीला वगळून एक नवीन चौकट तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. भारताचे नौसैनिक जहाज विराटवर नवीन शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. त्यापध्दतीत ज्या-ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी आपल्या उमेदवारांची चाचणी करण्यासाठी येतात त्यावेळी भरपूर तयारी होते. यातील एक जुना किस्सा असा आहे की, ऍडमिरल तलवार नावाचे अधिकारी होते. ते एकदा उमेदवारांच्या निरिक्षणासाठी विराटवर आले असतांना एका जागी जमीनीवर एक गोलाकार सुंदर रंग संगती त्यांनी पाहिली आणि विचारणा केली की, ही रंगरचना येथे का करण्यात आली आहे. त्यावेळेसच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर दिले की, का करण्यात येते हे माहित नाही परंतू अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू आहे. तेंव्हा ऍडमिरल तलवार म्हणाले की, माझ्या हाताने झालेली उमेदवारी काळातील चुक आहे ती चुक सुंदर दिसावी म्हणून मी माझ्या चुकीला रंगसंगती दिली. त्या रंगसंगतीचा परिणाम आजही सुरू आहे. याचा अर्थ असा होतो की, एखादे काम जे अनेक वर्षापासून सुरू आहे त्याचे कारण कोणाला माहित नसते. परंतू ते काम आपसुकच सुरू असते. या ऐतिहासीक घटनेतून मी असे काम सुरू राहणार नाही याकडे लक्ष देईल आणि नाविन्य पुर्ण काम करून एक नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. शासनाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पुर्ण करतांना कोठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेईल.