नांदेड(प्रतिनिधी)-सेवाकाळातील निलंबन आणि रजा रोखीकरण याचे 18 लाख रुपये बिल काढून देण्यासाठी 7 लाख 50 हजार रुपये घेवून फसवणूक करणाऱ्या तिन जणांविरुध्द एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहेदा बेगम सय्यद युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 मार्च 2024 रोजी त्यांच्या घरी इकरा उर्दु संस्था अर्धापूरचे अध्यक्ष सय्यद वसीम बारी सय्यद समशोद्दीन, सचिव फयाजोद्दीन अकबरोद्दीन अन्सारी आणि मुख्याध्यापक सय्यद जाकेर अली सय्यद सादत अली हे तिघे आले आणि त्यांना सांगितले की, त्यांचे मयत पती सय्यद युसूफ सय्यद मुसा यांचे सेवाकाळातील रजा रोखीकरण आणि निलंबन काळाचे 18 लाख रुपयांचे बिल काढून देण्यासाठी आयशा बेगमकडून 7 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश घेतला तो वठवला परंतू त्यांच्या पतीच्या नावाचे 18 लाख रुपयांचे बिल काढून दिले नाही आणि त्यांची फसवणूक केली. इतवारा पोलीसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 304 /2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड हे करणार आहेत.