येत्या विधानसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणुक आयुक्तांनी जारी केल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीसाठी सुचना

नांदेड(प्रतिनिधी)-हरियाना, झारखंड किंवा महाराष्ट्र आणि जम्मू काश्मिर येथील विधानसभा निवडणुका 2024 या 3 नोव्हेंबर 2024, 5 जानेवारी 2025, 26 नोव्हेंबर 2024 या वेळेत होणार आहेत. त्या संदर्भाने राज्यांमध्ये नियुक्तीस असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी मुख्य निवडणुक आयुक्त कार्यालयातील सचिव अश्र्विनीकुमार मोहाल यांनी सुचना जारी केल्या आहेत. आयोगाच्या सुचना 20 ऑगस्ट 2024 पर्यंत पुर्ण करायच्या आहेत.
मुख्य निवडणुक आयुक्त दिल्ली यांनी जारी केलेल्या पत्रानुसार प्रत्यक्ष किंवा परोक्ष रुपात अधिकाऱ्यांचा संबंध या निवडणुकांशी नसावा याची सुचना देतांना त्यात तो अधिकारी किंवा ती अधिकारी स्वत:च्या जिल्ह्यात नियुक्तीस नसावी. महाराष्ट्राच्या 30 नोव्हेंबर या कटऑफ तारखेनुसार मागील चार वर्षामध्ये त्या अधिकाऱ्याने सलग तीन वर्ष त्या विधानसभा क्षेत्रात नोकरी केलेली नसावी. यावेळेत त्या अधिकाऱ्याला पदोन्नती मिळाली असेल तरी पण तो काळ त्याचा गृहीत धरण्यात यावा. महसुल विभागातील अधिकाऱ्यांसाठी समन्वयक अधिकारी कसा असावा याचे सविस्तर विवेचन केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांसाठी दिलेल्या सुचनेनुसार डणुक सुरक्षेची जबाबदारी देतांना त्यांना बऱ्याच सुचना दिल्या आहेत. पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस निरिक्षक यांना त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती नसावी.मागील चार वर्षामध्ये कटऑफ तारखेपर्यंत तीन वर्ष त्या अधिकाऱ्याने पोलीस उपविभागात काम केले आहे. तो विभाग बदलून द्यावा. जिल्ह्यात अशी सोय नसेल तर त्याची बदली जिल्ह्याबाहेर करावी. एखाद्या पोलीस आयुक्तालयात अनेक जिल्हे असतील तर त्यातील अधिकारी आयुक्तालयात आणावेत.
दारु बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सुध्दा जवळपास अशाच सुचना जारी करण्यात आल्या आहेत. सेक्टर अधिकारी, झोनल अधिकारी नियुक्त्या करतांना ते निपक्षपाती असावेत याची सोय पाहावी. ज्या अधिकाऱ्यांविरुध्द निवडणुक आयोगाने पुर्वी शिस्तभंगाची कार्यवाही केलेली आहे अशा अधिकाऱ्यांना निवडणुक काळात बाजूला ठेवावे. ज्या अधिकाऱ्यांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. त्यांना निवडणुक जबाबदारीपासून दुर ठेवावे.
प्रत्येक अधिकाऱ्याकडून प्रतिज्ञा पत्र लिहुन घ्यायचे आहे. तसेच या आदेशांना मुख्य निवडणुक आयुक्तांचे 23 डिसेंबर 2008 रोजी जारी केलेले पत्र सुध्दा संदर्भ म्हणून जोडण्यात आलेले आहे. त्यात सुध्दा अधिकाऱ्यांच्या निवडणुक जबाबदाऱ्यांबद्दल वेगवेगळ्या सुचना दिलेल्या आहेत.
काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र शासनाने पोलीस विभागातील जिल्हा, परिक्षेत्र यानुसार विहित कालखंड पुर्ण केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. परंतू त्यातील अनेक अधिकारी आजही पुर्वीच्या जागांवरच कार्यरत आहेत. याबद्दल कोण विचारणा करेल आणि कोण निर्णय घेईल या संदर्भाने मात्र निवडणुक आयोगाच्या सुचनांमध्ये काही एक उल्लेख नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!