महाराष्ट्र विरशैव सभेचे कार्यकौतुकस्पद
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीने मला राज्यसभेमध्ये मला लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी या समाजाच्या विकासासाठी पाठविलीे आहे. राज्यामध्ये लोकसंख्येच्या 10 टक्के आपला समाज आहे पण आपण संघटीत नसल्यामुळे राजकीय क्षेत्रात आपले स्थान नगन्य आहे. येणाऱ्या काळात समाजाचा विकास करून घ्यायचा असेल तर विरशैव लिंगायत समाजाने या समाजातील सर्व संघटनांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एक होण्याची गरज निर्माण झाली आहे आणि एक व्हा समाजाच्या विकासासाठी मी तुमच्यासाठी 24 तास कार्यरत आहे, अशी ग्वाही खा.डॉ.अजित गोपछडे यांनी दिली.
महाराष्ट्र विरशैव सभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि गुरूगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दि.28 रोज रविवारी शहरातील भगक्ती लॉन्स येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन समाजाला एक होण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाला परमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश शेवाळकर, श्रीमती वंदनाताई गणपतराव मोरगे, महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र हुरणे, कार्याध्यक्ष जयचंद्र तत्तापुरे, सचिव राजन मिसाळे, उपाध्यक्ष प्रभाकर उदगिरे, अविनाश मारकोळे पाटील, संतोष पटणे, रितेश बुरांडे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी समाजातील संग्राम सदाशिव मस्कले आणि साईनाथ मारोतराव चंदापुरे या दोन व्यक्तींना गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी खा.गोपछडे बोलत असतांना म्हणाले की, समाजाच्या विकास करायचा असेल तर राजकारण हे माध्यम अंगीकारल पाहिजे. राजकारणातूनच समाजाचा विकास होतो. समाजाला दिशा मिळते. कै.गणपतराव मोरगे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. ते नेहमी म्हणायचे की, समाजासाठी नांदेड शहरात विरशैव भवन असल पाहिजे. पण समाजाने या ठिकाणी केलेल्या मागण्या मी निश्चितच एक वर्षात पुर्ण करण्याचा संकल्प करतो. यात विरशैव भवन, वस्तीगृह, समाजासाठीची स्मशानभुमी या तिन्ही मागण्याा एक वर्षात पुर्ण करण्याचा प्रयत्न करील. नांदेड शहरात चौफाळा आणि टंकीन येथे समाजाची स्मशानभुमी आहे. याचबरोबर नांदेडच्या उत्तर भागातही समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागातही एक स्मशानभुमी झाली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करू. समाजाने राजकारणात का येवू नये, राजकारणात आल पाहिजे. येवून राजकीय नेतृत्व केल पाहिजे. लिंगायत समाजाने उमेदवारी का मागू नये, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी समाजाने उमेदवाऱ्या मागितल्या पाहिजे आणि तो मागण्याचा अधिकार आहे. राज्यामध्ये अनेक लोकसभा कार्यक्षेत्रात लिंगायम समाज मोठ्या प्रमाणात आहे. यानी जर ठरवल तर कोणाला पाडायच आणि कोणाला निवडुण आणयच ही ताकत समाजात आहे. पण समाज एक नसल्यामुळे आपल्या राजकीय पक्ष आपला विचार करत नाही. यासाठी समाजाने एकजुट झाल पाहिजे असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमातून केल.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय होकर्णे, विपुल मोळके, गुरुराज पाटील, अतुल बेरळीकर, सुरेश मिटकरी, अमोल नागठाणे, बालाजी बोंमनाळीकर ,नंदकुमार दुधेवार,तुकाराम पाटील, हंसराज पाटील,संतोष बोमणाळे, केदार नागठाणे,संजय चिंचोलकर, एड. चन्द्रशेखर नरवाडे, रमेश नांदेडकर, सौ. विजया साखरे, वैशाली मारकोळे,श्रीमती शुभांगी पाटील, सौ सुजाता मिसाळे,चंदा हळदे ,अरुणा होकरणे,डॉ. सारिका धोंडे ,विजया इंद्राळे,अर्चना झाडबुके, आसावरी हुरणे, कल्पना केसराळे, शालिनी शिवपुजे, डॉ.शिल्पा बोंमनाळे, वैजयंती तोंडारकर त्याचबरोबर प्रांतिक सदस्य ,रघुनाथ कोकणे, वीरभद्र आप्पा धोंडे,तुकाराम इंद्राळे, मदन पाटील, शिवकुमार बुके, मारोतराव साडेगावकर, जयश्री तोडकरी, शोभा कोकणे आदिनी प्रयत्न केले.