श्रीमंताची मजा तर शेतकऱ्यांना सजा; कॉंग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र सरकारने नुकताच अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला. पण यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीच तरतूद केली नाही. उलट हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी लावून श्रीमंतांची मजा केली आणि शेतकऱ्यांच्या कृषी औषधांवर 18 टक्के जीएसटी लावून शेतकऱ्यांना सजा दिली. या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात जिल्हा कॉंगे्रस कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दि.29 रोज सोमवारी कॉंगे्रस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या धोरणाविरुध्द धरणे आंदोलन करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूद केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी कॉंग्रेस पक्षाने पुर्वीपासून केली होती. पण या सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळ्याचे काम केल. शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची मदत व तरतूद या अर्थसंकल्पात केली नाही. यामध्ये रासायनिक खते, किटकनाशके, शेती औजारे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य या बाबीवर जीएसटी वगळण्यात आली नाही. तर दुसरीकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ करण्यात आले तर श्रीमंतांना जीएसटीमधून सुट दिली आहे. हिरे खरेदीवर 3 टक्के जीएसटी हे. या सर्व अन्यायाच्या बाबतीत जिल्हा कॉंगे्रसचे धरणे आंदोलन केले. यामध्ये जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील रावणगावकर, प्रफुल्ल सावंत, सुरेंद्र घोडजकर सत्यपाल सावंत, श्रावण रॅपनवाडे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!