नांदेड- मोर चौक ते वाडी बु. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सोमवारी लाक्षणीक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला यश आले असून दोन दिवसात रस्ता दुरुस्त केला जाईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मोर चौक ते वाडी बु. या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्यामुळे दररोज अपघात होत आहेत. हा रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी नागरीक कृती समितीच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आले. तीन हजार सह्यांचे निवेदन देऊनही दखल न घेतल्यामुळे सोमवारी (29 जुलै) कृती समितीच्या वतीने लाक्षणीक उपोषण करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी खड्यांची पुजा करून बेशरमाचे झाडे लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाईक यांनी उपोषण स्थळी भेट देऊन रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात याला.
उपोषणात कृती समितीचे अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष संकेत जमदाडे, सचिव विजय कुलकर्णी, उपाध्यक्ष वसंत क-हाळे, नंदकुमार बनसोडे, कोषाध्यक्ष किरण नाईक, पंकज कद्रेकर, संतोष धानोरकर,बी.बी. एंगडे, सौ.उज्वा दर्डा, सौ. सुर्यवंशी, शंकर लकडे, जयराम वडजे, राम जाधव, संतीष गंजेवार, रायपल्ले यांचा सहभाग होता.
उपोषणाला संगीता पा. डक, विठ्ठल पावडे, डॉ.सुजित येवलीकर, बंडू पावडे, छोटा बंडु पावडे, विजय बगाटे, दत्ता कोकाटे, महेश हंगरगेकर यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.