नांदेड(प्रतिनिधी)-उद्या आषाढी एकादशीनिमित्त भव्य माऊली दिंडी निघणार आहे. ज्या भाविकांना पंढरपुराला जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. विठ्ठल भक्तांनी मोठ्या संख्येत या दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.रमेश नारलावार यांनी केले आहे.
प्रति पंढरपुर माऊली दिंडीचे मुख्य संयोजक डॉ.रमेश नारलावार यांनी पत्रकार परिषद बोलावून ही माहिती देतांना सांगितले की, उद्या दि.17 जुलै रोजी निघणाऱ्या दिंडीचे दोन महत्वपुर्ण उद्देश आहेत. भव्य सांस्कृतीक कार्यक्रम, हिंदु जनजागरण व हिंदु एकत्रितकरण. ज्या योगे हिंदुंनी आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार करावा, तसेच सर्व डॉक्टर्स, सर्व संघटना, सर्व व्यापारी, सामाजिक संघटना, भजनी मंडळी, महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ व इतर अनेक संघटनांनी या दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या दिंडी सोहळ्यात नांदेडमधील भाविक भक्त व नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.नारलावार यांनी केले आहे.
दि.17 जुलै 2024 रोजी बुधवारी शोभा यात्रेची सुरूवात दुपारी 2.30 वाजता विठ्ठल रुक्माई मंदिर, संत नाे मंदिर, नवीन पुलखाली या ठिकाणावरून निघेल. जुना मोंढा, कलामंदिर व स्वामी समर्थ मंदिर इतपर्यंत ही दिंडी जाईल. स्वामी समर्थ मंदिरात महाप्रसादाने या दिंडीची सांगता होणार आहे. या आनंददायी यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन डॉ.रमेश नारलावार, शंकरराव शिंगेवार, गणेश ठाकूर, मोहन पाटील, डॉ.तळणकर, मोरे काका, डॉ.राईवार, अरुण दमकोंडवार, महिला आघाडीच्यावतीने सौ.चंदा काबरा, सौ.प्राची चौधरी आणि कु. ज्योती पाटील यांनी केले आहे. यावर्षीच्या दिंडीत गरजवंत रुग्णांना डॉ.रमेश नारलावार व मोहन पाटील यांच्याकडून 18 हजार 650 रुपयांची औषधी पंढरपुर येथे पाठविण्यात आली आहे.