नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 दरम्यान तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथील अखंड पाठ साहिब विभागात 36 लाख 69 हजार 350 रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत पाच वर्षानंतर काल वजिराबाद पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी या 36 लाख 69 हजारांच्या घोटाळ्यासंदर्भाने मागील पाच वर्षापासून विविध सक्षम अधिकाऱ्यांकडे, न्यायालयाकडे न्यायाची मागणी केली होती. पाच वर्षानंतर वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा क्रमांक 303/2023 दाखल केला आहे.
या प्रकरणात तक्रारीत लिहिल्याप्रमाणे मी आणि माझ्यासारखे अनेक सिख बांधव व इतर समाजाचे श्रध्दाळू बांधव यांनी तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे अखंड पाठ साहिब विभागात पाठ पठण करण्यासाठी श्रध्देने पैसे दान केले. या विभागातील लिपीक महिपालसिंघ कृपालसिंघ लिखारी रा.नंदीग्राम सोसायटी, धर्मसिंघ मोहनसिंघ झिजदार रा.बडपुरा या मुख्य लिपीकाने. तसेच रविंद्रसिंघ हजुरासिंघ सुखई हे अधिक्षक रा.अबचलनगर नांदेड ठाणसिंघ जिवनसिंघ बुगई रा.चिखलवाडी नांदेड जे सध्या प्रभारी अधिक्षक गुरूद्वारा बोर्ड या पदावर कार्यरत आहेत. या सर्वांनी मिळून सन 2016 ते 2019 दरम्यान अखंड पाठ साहिब विभागात श्रध्दाळूंनी दान केलेल्या पैशांपैकी 36 लाख 69 हजार 350 रुपयांची अफरातफर केली आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम हे या प्रकराचा अधिक तपास करणार आहेत.
One thought on “सचखंड श्री हजुर साहिब येथे सन 2016 ते 2019 दरम्यान झालेल्या 36 लाख 70 हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल”