नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या झाल्या होत्या. या चोरट्यांना इतवारा पोलीस उपअधिक्षकांच्या विशेष पथकाने पकडले आहे.
दि.1 जुलै रोजी इतवारा पोलीस उपविभागातील पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बाफना टी पॉईंट येथून परमेश्र्वर उर्फ बंडू मुसळे (24) रा.हस्तरा ता.हदगाव जि.नांदेड आणि विष्णु बालाजी शिरफुले (19) रा.कामारी ता.हिमायतनगर जि.नांदेड यांना पकडले. हे दोघे सध्या तरोडा (बु) येथे उल्हासनगर येथे प्रमोद तुप्तेवार यांच्या घरात किरायाणे राहतात. या दोघांनी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला जबरी चोरीचा गुन्हा क्रमांक 282/2024 आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा क्रमांक 144/2024 यांनीच घडविले आहेत अशी कबुली दिली. या दोघांना पुढील तपासासाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हा क्रमांक 282 मध्ये स्कुटीवर जाणाऱ्या महिला देवकी सत्यजित डोईफोडे यांची बॅग या चोरट्यांनी लुटली होती. त्यात चोरीला गेलेले साहित्य, रोख रक्कम, दोन मोबाईल् आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी गा साा एकूण 1 लाख 91 हजार रुपयांचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे. गुन्हा क्रमांक 282 चा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद देशमुख करीत आहेत.
जबरीचा गुन्हा घडल्यानंतर 24 तासात आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस पथकातील पोलीसांचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमाार नायक यांनी कौतुक केले आहे. ही कामगिरी पोलीस अंमलदार अर्जुन मुंडेे, चंपद्रकांत स्वामी, संतोष बेल्लूरोड आणि श्रीराम दासरे यांनी पार पाडली आहे.