नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरास कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या एका कुटूंबाला हा प्रवास महागात पडला आणि त्याचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 29 हजार 970 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. डॉ.सुनिल इंदलसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे घर सरस्वती मंदिराजवळ शहिद भगतसिंघनगर किनवट येथे आहे. 12 जून रोजी ते आपले घर बंद करून बाहेरगावी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून कपाटातील रोख रक्कम 40 हजार रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 29 हजार 970 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. किनवट पोलीसांनी हा चोरीचा प्रकार गुन्हा क्रमांक 155 /2024 नुसार दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक झाडे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 940 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महामार्गात जाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 25 पोलीस अंमलदार कार्यमुक्त मुखेडमध्ये जमीनीच्या खरेदी खतात खोट्या चतु:सिमा दाखवल्या