नांदेड – येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला. या शिबिरात उपस्थित गवळी समाजातील जवळपास १०० विधार्थी, विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह , श्रीमद भागवत गीता आणि पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद सीताराम मंडले तर प्रमुख अतिथी म्हणून दीक्षा अकॅडमीचे संचालक लक्ष्मीशंकर यादव, नांदेड विद्यापीठातील डॉ कैलाश यादव , नेहरू स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. ममता यादव, सहायक सरकारी अभिवक्ता सौ. प्रसन्ना रौत्रे , सी. ए. अखिलेश मंडले, ऍड हरिकिशन मंडले उपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षा मित्र सुशांत यादव व दीपक यादव यांनी आतापर्यंत संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली तदनंतर डॉ. कैलाश यादव यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या उज्व भविष्यारिता शुभेच्छा देऊन नांदेड विद्यापीठात उपलब्ध असलेल्या आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट, बी फार्मसी, पत्रकारिता, बी बी ए, डिजिटल मार्केटिंग अश्या विविध अभ्यासक्रमाची व प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली
मुख्याध्यापिका पदावर असलेल्या सौ. ममता यादव यांनी शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण हा प्रवास करतांना पालक आणि विध्यार्थी यांचे कर्तव्य आणि जबाबदारी याची भागवत गीतेतील विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना माहिती दिली. तसेच सरकारी अभिवक्ता सौ . प्रसन्ना यांनी लॉ फिल्ड मधील रोजगाराच्या विविध संधी आणि आव्हाने या बाबीवर प्रकाश टाकला .
प्रमुख पाहुणे प्रा.लक्ष्मीशंकर यादव यांनी १०वी आणि १२वी पास विध्यार्थ्यांना विशेष लक्ष्य करत IIT , JEE , NEET या परीक्षेकरिता कशी तयारी करावी डॉक्टर आणि इंजिनियर होण्याकरिता लागणाऱ्या पात्रता दोघातील फरक आणि स्पर्धा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून नांदेड गवळी समाजातील शिक्षणाचा वाढता आलेख पाहून समाधान व्यक्त केले दोन वर्ष परिश्रम घेतल्यास उर्वरित आयुष्य सुखमयी जाईल असे प्रतिपादन त्यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरबल यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन कोतवाल यांनी मानले सदर कार्यक्रमास गंगालालजी भातावाले, संदीप मंडले,गोविंद मंडले, विशाल रौत्रे यांची विशेष सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपाध्यक्ष योगेश बटाववाले, संतोष मंडले,नीलेश भातावाले,रमेश रौत्रे,सुरज कुटल्यावाले, अर्जुन मंडले, प्रथमेश मंडले, यांनी परिश्रम घेतले समाजातील युवक- युवती व समाज बंधूं मोठ्या संख्येने उपस्थित होते.