नांदेड(प्रतिनिधी)-उद्या दि.4 जून रोजी देशभरात 17 व्या लोकसभेची मतमोजणी होणार आहे. त्याच अनुशंगाने नांदेडमध्ये नांदेड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काही मार्गांना वाहतुकीसाठी बंद केलेले आहे तर बंद केलेल्या वाहतुक मार्गांसाठी पर्याय सुचविले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 नुसार पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा उपयोग करून त्यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर येथे 4 जून रोजी होणाऱ्या लोकसभा मतमोजणीसाठी काही वाहतुक मार्ग बंद केले आहेत. तसेच त्या मार्गांना पर्यायी वाहतुक मार्ग सुचवले आहेत. हा मार्ग बंद आणि पर्यायी मार्गांचा आदेश 4 जून रोजी सकाळी 6 ते मतमोजणी पुर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. अपेक्षेप्रमाणे सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण होईल. तो पर्यंत हे आदेश लागू राहतील. जनतेने पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि आपल्या गंतव्याकडे जावे असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग
नवीन मोंढा कमान ते आयटीआय चौक(कसूम सभागह) कडे जाणारा रस्ता वाहतुकीस पुर्णपणे बंद राहिल. महात्मा फुले हायस्कुल ते डॉ.शंकरराव चव्हाण पुतळा (लॉ कॉलेज टी पॉईंट) कडे जाणारा रस्ता वाहतुकीस पुर्णपणे बंद राहिल. तसेच उज्वल गॅस कार्यालय ते महादेव दाल मिलकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकी करीता पर्यायी मार्ग
अण्णाभाऊ साठे पुतळा येथून आयटीआयकडे जाणाऱ्या नागरीकांसाठी नाईक चौक-आनंदनगर-वर्कशॉप ते आयटीआय या मार्गावरील वाहतुक चालू राहिल. नवीन मोंढाकडे येणाऱ्या वाहनांसाठी आयटीआय-वर्कशॉप आनंदनगर-नाईक चौक, ते नवीन मोंढा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहिल.