नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड येथील अल रिझवान इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनि मुन्जजा अफशीन मुंतजीबोद्दिन हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे हिने कोणतीही खासगी शिकवणी लावलेली नव्हती. मुन्जजा अफशीन स्वतःची मेहनत व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे आणि यू पी एस सी ची तयारी करायची आहे, असे तिने सांगितले. माजी नगरसेवक व दैनिक नांदेड टाईम्स उर्दू चे संपादक मुंतजीबोद्दिन यांची मुन्जजा ही कन्या आहे.तिचे आजोबा फैजुल उलूम हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्यअध्यापक मुनीरोद्दिन यांनी व नातलगांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले.
More Related Articles
एसजीजीएस महाविद्यालयातील संचालकांनी शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून स्वत:साठी खरेदी केले 36 लाखांचे वाहन
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेत संचालकांच्या मनावर गोंधळ सुरू असून शासनाच्या…
बारावीच्या विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविणार दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही नांदेड- केवळ बारावीच नव्हे तर…
नारायणा ई टेक्नो शाळेला मान्यता रद्द करण्याची कारणे दाखवा नोटीस
इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर जिल्हा परिषदेचे लक्ष कधी जाणार? नांदेड(प्रतिनिधी)-नायरायण ई टेक्नो शाळेला जिल्हा परिषदेचे…
