नांदेड – अवैध सावकारीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गणेश नगर, नांदेड येथील ज्ञानेश्वर विठ्ठलराव कदम यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या घरझडतीत अवैध सावकारीसंदर्भातील एकूण २३ कागदपत्रे आढळून आली आहेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड कार्यालयास प्राप्त झालेल्या अवैध सावकारीच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम १६ अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी सहकार अधिकारी श्रेणी-१ एम. आर. येवते यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले. या पथकाने दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी कदम यांच्या गणेश नगर येथील निवासस्थानी घरझडती घेतली. यावेळी अवैध सावकारीशी संबंधित २३ कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रांच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहकारी संस्थेचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आणि उपनिबंधक ए. डी. भागानगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अवैध सावकारीची तक्रार करण्याचे आवाहन कोणतीही व्यक्ती परवान्याशिवाय सावकारी करीत असेल किंवा बेकायदेशीररीत्या चढ्या व्याजदराने कर्ज देऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत असेल, तर नागरिकांनी न घाबरता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तसेच संबंधित तालुक्यातील उपनिबंधक किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 57 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नटसम्राट नाटकाला नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद