मागील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश; विदेशी दारूसह डीव्हीआर हार्डडिस्क चोरीला हिमायतनगर (प्रतिनिधी) – शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या न्यू दरबार बार अँड रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बारच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी विदेशी दारू आणि डीव्हीआर हार्डडिस्क असा एकूण ६१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने बारच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बारमधील विदेशी दारू तसेच डीव्हीआर हार्डडिस्क असा एकूण ६१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बारचे फिर्यादी सुमित बालाजी कांगणे (वय २९, रा. नेहरू नगर, हिमायतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) व ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोडाम करीत आहेत. शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 150 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मधुकर कदम यांना मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला हळदीच्या पिकात गांजाची लागवड; ६.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त