खंजीर, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण; सोनखेड पोलीस ठाण्यात सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – मित्राला मारहाण का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीवर खंजीर, लोखंडी रॉड आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी साडेदोन वाजण्याच्या सुमारास नांदेड ते उस्माननगर जाणाऱ्या रस्त्यावरील के.पी. बार परिसरात घडली. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी प्रतापसिंग दर्शनसिंग रखुवंशी (वय ४२, रा. राहुलनगर, सिडको, नांदेड) यांनी सोनखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश माधवराव मिरासे, रा. सिडको 2. रितेष यादव, रा हडको 3. शिवम ऊर्फ चिक्या वडजे, 4. निलेश बोडके, 5. वैभव दळवे, तिघे रा वडेपूरी 6. राजेश शिंदे व इतर चार ते पाच जणांनी बेकायदेशीर जमाव जमविला. मधुकर कदम यांना का मारहाण केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला चढविला. यावेळी खंजीर, लोखंडी रॉड व दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(१)(२)(३), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 16 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एस.टी. बसचालकावर हल्ला;ऑटो चालकास १६ वर्षांनंतर सश्रम कारावास