नांदेड(प्रतिनिधी)-समीर येवतीकर आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.22 मे रोजी अंबिकानगर नांदेड येथे समिर सुधाकर येवतीकर यांचे प्रेत सापडले. त्यांनी स्वत: गळफास लावून घेतली होती. पण मरण्यापुर्वी त्यांनी 9.55 वाजता पोलीस अधिक्षक नांदेड यांच्या नावे सुसाईड नोट लिहिले होते. ज्यामध्ये दिपक सुभाष पाटील याच्याकडून काही वर्षापुर्वी व्यवसायासाठी म्हणून व्याजाने एक लाख रुपये घेतले आणि नंतर काही दिवसांंनी एक लाख रुपये घेतले. मी त्यांना व्यवस्थीत व्याज देत होतो. पण नंतर काही कारणामुळे व्याज वेळेवर देणे झाले नाही. त्यावेळीस त्यांनी मला 1 लाख रुपयांच्या म्हणजे 6 टक्के दराने प्रत्येक दिवशी दंड म्हणून 1 हजार रुपये लावण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे मी हातबल झालो आणि जगणे अवघड झाले आणि मी मृत्यू पुकारत आहे असे लिहिले आहे. या सुसाईड नोटमध्ये समिर येवतीकरने आपला मोबाईल नंबर आणि दिपक पाटीलचे मोबाईल नंबर लिहिले आहे.
भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 385, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा क्रमांक 214/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रकाश कुकडे यांच्याकडे होता. दरम्यान भाग्यनगर पोलीसांनी याप्रकरणातील आरोपी संदीप उर्फ हेमंत लालजी ढगे (33) रा.नवजीवननगर नांदेड आणि दयानंद दिगंबर विभुते (32) रा.सरपंचनगर नांदेड या दोघांना अटक केली.दरम्यान पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे यांच्याकडे वर्ग केला. आज पोलीस निरिक्षक शेंडगे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या संदीप ढगे आणि दयानंद विभुते यांना न्यायालयात हजर केले. घडलेल्या प्रकरणाचा तपास सुयोग्य व्हावा म्हणून पोलीसांनी केलेले सादरीकरण मान्य करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ढगे आणि विभुते या दोघांना दोन दिवस अर्थात 26 मे 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आज शहरातील बरेच अवैध सावकारी दुकाने बंद
समीर सदाशिवराव येवतीकर याने अवैध सावकारी व्यवसायला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर आज शहरातील सर्वच अवैध सावकारी व्यवसायाचे शटर बंद होते. अवैध सावकारी व्यवसाय हा नांदेड शहरात मोठ्याच प्रमाणात आहे. त्यात विविध वसुली अधिकारी आहेत. पण त्यांच्यावर काही कार्यवाही होत नाही. याप्रकरणातील फरार आरोपी दिपक सुभाष पाटील हे तर राजकीय पक्षात नेते आहेत. समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नेते मंडळीच असा अवैध सावकारी व्यवसाय करत असतील तर काय म्हणावे.