नांदेड(प्रतिनिधी)-सध्या आयपीएल क्रिकेट मॅचेस अंतिम टप्यात आल्या असतांना यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात आहे. यातच देगलूर येथे क्रिकेट प्रेमीयांनी सट्टा लावला होता. याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी यावर छापा टाकून पाच जणांविरुध्द कार्यवाहीत करत त्यांच्याकडून1 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने देगलूर परीसरात जावून क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या लोकांची गोपनीय माहीती काढली असता सुरज पुजलवार यांचे रामपूर रोड येथील शेतात काही जण मोबाईल फोनवरुन राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे मध्ये चालू असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत व खेळवित आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने माहीती मिळालेल्या ठिकाणी दिनांक 22 मे 2024 रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास अचानक छापा मारला असता तिथे असलेल्या पैकी एक जन पळून गेला. व तीन जनांना मोबाईल फोनसह ताब्यात घेण्यात आले.
यामध्ये सुरज हणमंतराव पुजलवार (30) रा.शिदबानगर देगलूर, अदिनाथ बालाजी अटपलवार (28)रा. लाईनगल्ली देगलूर आणि किशोर हणमंत अप्पा मठपती (25)वर्षे रा. आलूर ता. देगलूर असे सांगीतले त्यांना पळून गेलेल्याचे नाव पत्ता विचारता त्याचे नाव साईनाथ गंगाधर बोनलवार रा. भायेगाव रोड देगलूर असे असल्याचे सांगीतले. सदर क्रिक्रेट सट्टा हा सय्यद फेरोज ऊर्फ एफ.एम. रा.मुखेड यास देत असल्याचे सांगीतले. ताब्यातील मोबाईल फोनची पाहणी करता त्यात लाईव्ह मॅच पाहून ग्राहकांचे कॉल स्विकारुन ग्राहकांना भाव सांगून ते क्रिकेट लाईन गुरु ऍपवर राजस्थान रॉयल्स विरुध्द रॉयल चॅलेजंर्स बेगलोर या क्रिकेट मॅचवर ग्राहकाकडून क्रिकेट सट्टा जुगार खेळत व खेळवित असताना दिसून आले. यावेळी क्रिकेट सटयाचे अंक लिहीलेली डायरी कि.अं. 20 रु. विविध कंपन्यांचे एकुण 09 मोबाईल फोन किंमती अंदाजे 1,11000, रोख रक्कम 2000/- रु. असा एकुण 1,13,020/- रु.चा मुद्येमाल मिळून आला.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे संजय विश्वनाथ केंद्रे सपोउपनि स्था.गु.शा. नांदेड यांचे फिर्यादवरुन देगलूर पोलीस गुन्हा क्रमांक 217/2024 कलम 12 (अ) म.जु.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोउपनि फड हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय केंद्रे,पोलीस अंमलदार विठ्ठल शेळके, गणेश धुमाळ आणि चालक कलीम यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे