नांदेड(प्रतिनिधी)-द. म.रे च्या नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्री करूसाठी कन्फर्म तिकीट मिळत नसून हज यात्रेकरूना विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनाला खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनात नांदेड येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत आहे. त्यामुळे देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसला २८ आणि २९ मे या दोन दिवसा करिता हज यात्रे निमित्त दोन स्लिपर कोच वाढवण्यात यावे तसेच हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती खादिम हुजाज ट्रस्ट नांदेड यांच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी खादिम हुज्जज ट्रस्ट चे अखिल अहमद कंधारी , मोहम्मद नवीद इक्बाल, मीर जावीद अली , शेख मोईन, हसनैन शेख, इक्बाल सिद्दीकी, बशीर अहमद,हैदर अली उपस्थित होते.
More Related Articles
नांदेड ग्रामीण पोलीसांनी तिन चोरट्यांकडून तीन दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोरट्यांना पकडून तिन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्यांची…
ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी अनंतात विलीन
नांदेड(प्रतिनिधी) शहरातील जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी वय 70 यांचे रविवारी दुपारी निधन झाले. जोशी यांनी…
रेतीचा हिशोब करण्यासाठी जुन्या तज्ञ पोलीसाकडून नव्या व्यक्तीला प्रशिक्षण
नांदेड(प्रतिनिधी)-रेतीचा कारभार 95 टक्के बंद असला तरी भविष्यात आशा लक्षात ठेवून त्या कारभाराला योग्य रितीने…