नांदेड(प्रतिनिधी)-वाळू वाहतुक करण्याच्या गाड्यांवर दैनिक प्रेस, पत्रकार असे शब्द लिहुन त्या गाड्या चालविल्या जात आहेत. पुर्वी काही पत्रकार दुसऱ्यांच्या नावावर रॉकेलचे लायन्सस घेत होते आणि व्यवसाय करत होते. आता तर चक्क वाळूंच्या गाड्यांवर प्रेस, पत्रकार असे शब्द लिहुन प्रेस आणि पत्रकारांची किती वाह-वाह केली जात आहे हे आश्चर्य जणक आहे. कोणत्याही प्रशासकीय अधिकारी याबद्दल जाब विचारत नाही हे त्यापेक्षत्त आश्चर्यकार आहे. आज प्राप्त झालेल्या एका फोटो प्रमाणे वाळू वाहतुक करणारी गाडी क्रमांक एम.एच.31सी.क्यू. 8920 त्या गाडीच्या मागच्या बाजूला पायी चालतांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे असे सुचना शब्द लिहिलेले आहेत. सोबतच त्यावर दैनिक प्रेस आणि पत्रकार हे दोन शब्द अजून लिहिलेले आहेत. म्हणजे प्रशासनाने या गाडीला काहीच विचारणा करू नये असाच त्याचा अर्थ होतो. शिवाय या गाडीमध्ये दिसणाऱ्या परिस्थितीप्रमाणे या गाडीला फिटनेस केसे प्राप्त झाले हा सुध्दा एक मोठा शोध विषय होवू शकतो. पोलीसांनी किंवा आरटीओ विभागाने या गाडीची काहीच विचारणा करून नये असाच संदेश दैनिक प्रेस आणि पत्रकार लिहिल्यावरून जाणवतो आणि जर असे लिहिल्यामुळे प्रशासनातील मंडळी या गाडीची विचारणाच करत नसतील तर मग यापेक्षा या लोकशाहीचे दुर्देव ते काय? Kanthak Suryatal Post Views: 10 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस अंमलदाराने पोलीस महासंचालकांचे कर्ज मंजुर करून घेण्यासाठी पोलीसांकडून घेतले होते प्रत्येकी 2 लाख न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या संपाचा दुसरा दिवस