नांदेड(प्रतिनिधी)-एका 42 वर्षीय आवळा व्यवसायीकाने खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन आत्महत्या केल्याचा प्रकार अंबिकानगरमध्ये घडला. आपल्या वडीलांनी गळफास घेतल्याची घटना सर्व प्रथम त्यांच्या मुलानेच पाहिली.भाग्यनगर पोलीस त्या ठिकाणी सध्या कायदेशीर कार्यवाही करत आहेत.
अंबिकानगरमध्ये आवळा व्यवसायीक समीर येवतीकर (42) यांचे घरी आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास त्यांच्या वडीलांनी आपल्या नातवाला तुझ्या बाबाकडे माझा फोन आहे तो घेवून ये म्हणून त्याला वरच्या मजल्यावर पाठविले. तेंव्हा नातू खाली ओरडतच आला की, बाबा दोरीला लटकलेले आहेत. त्यानंतर समीरची पत्नी त्यांचे वडील त्या खोलीत गेले. समीरच्या पत्नीने ती दोरी कापली. परंतू त्या आगोदरच समीर येवतीकरचा मृत्यू झाला होता. ्यांच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने एक सुसाईड नोट लिहिले आहे. त्यामध्ये कोणी दिपक पाटील नावाच्या व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाऊ रक्कमेसाठी दररोज 1 हजार रुपये व्याज देतो अशी नोंद त्या कागदपत्रांमध्ये आहे आणि त्याच्या त्रासाला कंटाळूनच मी आत्महत्या करत आहे असे त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे.
घटनास्थळी भाग्यनगर पोलीस हजर असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तेथे हजर असणारे पोलीस अंमलदार पत्रकारांना प्रतिसाद देत नाहीत. काही पत्रकार सांगतात की, सुसाईड नोटचा फोटो काढून पोलीस अंमलदारांनी तेथे हजर नसलेल्या पत्रकारांच्या मोबाईलवर पाठविला आहे. यामध्ये सत्यता किती हे देवच जाणे.
One thought on “सावकारी व्याजाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या”