भाग्यनगर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – पत्नीच्या वाढदिवसानिमित्त बाहेर जेवणासाठी जाण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पतीने पत्नीला शिवीगाळ करून ओढणीने गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरातील सिंचननगर परिसरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास सिंचननगर, नांदेड येथे हा प्रकार घडला. राजू दशरथ लष्करे (वय ३३, रा. सिंचननगर, नांदेड) याने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी बाहेर जाण्याबाबत विचारणा केली. मात्र, पत्नी वैष्णवी राजू लष्करे (वय २२) हिने नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला. याच रागातून आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट केली आणि ओढणीने तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी फिर्यादी वैष्णवी लष्करे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात आरोपी राजू लष्करे याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ६५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(२), ११५(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 203 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिथे बालपण गेले… तिथेच अधिवक्ता म्हणून परतले! माजी विद्यार्थ्याने आपल्या चिरंजीवांसह विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत साजरी केली दिवाळी!