नांदेड (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नांदेडकरांची दिवाळी पाडवा पहाट सुमधुर आणि सुरमयी असणार आहे. शहरातील गोदाकाठावर बंदाघाट येथे दरवर्षी दिवाळी पहाट या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन होत असते. त्याप्रमाणे यावर्षीही दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५. ३० वाजता, बंदाघाट येथे शेतकऱ्यांना समर्पित दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम होत आहे. नांदेड उत्सव समिती, गुरुद्वारा बोर्ड, स्वरमेघ म्युझिक कल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने या शेतकऱ्यांना समर्पित दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपला अन्नदाता शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. संकटाच्या या काळात संगीताच्या माध्यमातून धीराने या संकटाला सामोरे जाण्यासाठीचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांवर आणि कृषी क्षेत्रावर आधारित गीतंही सादर केली जाणार आहेत. या कार्यक्रमात संयोजक तथा संपादक केशव घोणसे पाटील, प्रख्यात गायिका आणि स्वरमेघ म्युझिक कल्चरच्या मेघा गायकवाड, दीपक गिरी (प्रख्यात गायक, छत्रपती संभाजीनगर), शुभम गोसावी (गायक, छत्रपती संभाजीनगर), प्रभा पत्की (गायिका, नांदेड), अनु नितनवरे (गायिका, नांदेड), शशिकांत जोशी (गायक, नांदेड) हे विविध मराठी- हिंदी गीतं सादर करणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीचे डॉ.हंसराज वैद्य, इंजि.संजीवन गायकवाड, भार्गव राजे, डॉ.दत्ता मोरे, ॲड. अनिल पाटील, बालाजी इबितदार, गजानन पाटील मुधोळ, बालाजी इंगळे खानापूरकर, अतुल बुरेवार, आशुतोष घोणसे पाटील आदींनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 23 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फुकट्यांकडून रेल्वेने दोन दिवसात वसूल केले १२ लाख ७५ हजार ९४० रुपये