१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सहा दुचाकींसह ३ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मध्यरात्रीच्या कारवाईत ११ जण रंगेहात ताब्यात; जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांचीही नावे निष्पन्न
नांदेड (प्रतिनिधी) –  शहरातील अवैध धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने लिंगायत स्मशानभूमीजवळ झाडीतील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकून १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले, तर जुगार अड्डा चालविणाऱ्या अन्य चार जणांची नावे चौकशीत निष्पन्न झाली. पोलिसांनी सहा मोटारसायकली, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचारी गस्तीवर होते. गस्तीदरम्यान ते देगलूरचाळ परिसरात आले असता गोपनीय बातमीदाराकडून लिंगायत स्मशानभूमीजवळील झाडीतील मोकळ्या जागेत काही इसम पैशांवर ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या ११ जणांना जागीच ताब्यात घेण्यात आले. पुढील चौकशीत जुगार अड्डा चालविणाऱ्या आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे 

१) शेख नदीम शेख अब्दुल्ला (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. बरकतपुरा, वाघी रोड, नांदेड).

२) सय्यद जुबेर सय्यद नवाबअली (वय २३, व्यवसाय मजुरी, रा. खडकपुरा, नांदेड).

३) बिलसिंग कातिसिंग रागी (वय ३५, व्यवसाय ऑटोचालक, रा. शहीदपुरा गेट क्र. ०५, नांदेड).

४) इरफान बेग समदाणी बेग (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. तेहरानगर, घामोडीया फॅक्टरी, बसस्थानक, नांदेड).

५) मोहम्मद जमीर पिता अब्दुल रज्जाक (वय ३८, व्यवसाय मजुरी, रा. गोवर्धनघाट टेकडी, नांदेड).

६) महमंद शाकीर पिता महमंद ताजोद्दीन (वय ४७, व्यवसाय व्यापार, रा. नवीन हदगापूर, वाघी रोड, नांदेड).

७) शमशोद्दीन अमीरोद्दीन शेख (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. मिलगेट, जेलरोड, नांदेड).

८) सय्यद मोसीन सय्यद कासीम (वय ३०, व्यवसाय मिस्त्री, रा. दुर्गे शाह रहमाननगर, वाघी रोड, नांदेड).

९) अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार (वय ३०, व्यवसाय व्यापार, रा. दुर्गे शाह रहमाननगर, वाघी रोड, नांदेड).

१०) हरजितसिंग कुलवंतसिंग चहल (वय ३०, व्यवसाय खासगी नोकरी, रा. गुरुद्वारा गेट क्र. ०४, नांदेड).

११) भगतसिंग गुरुदयालसिंग ढिल्लो (वय ४७, व्यवसाय खासगी नोकरी, रा. गुरुद्वारा गेट क्र. ०४, नांदेड).

**जुगार अड्डा चालविणाऱ्या निष्पन्न झालेल्या चौघांची नावे :**

१२) सय्यद निसार (रा. खडकपुरा, नांदेड).

१३) सय्यद फरहान (रा. खडकपुरा, नांदेड).

१४) यासीन शेख (रा. दुर्गे शाह रहमाननगर, वाघी रोड, नांदेड).

१५) युसूफखान युनूसखान (रा. दुर्गे शाह रहमाननगर, वाघी रोड, नांदेड).

सहा दुचाकींसह ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपींची अंगझडती आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. यामध्ये ३ हजार ३९० रुपये रोख, जुगाराचे साहित्य तसेच सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मोटारसायकलींचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

१) MH-46-BS-6224
२) MH-26-CG-4850
३) MH-26-AU-6113
४) MH-26-Y-4813
५) MH-26-CG-5125
६) MH-26-CN-6917

या सहा मोटारसायकलींची अंदाजे किंमत ३ लाख ५५ हजार रुपये असून रोख रक्कम आणि जुगाराच्या साहित्यांसह एकूण ३ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वजणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक खंडू दर्शने तसेच पोलीस अंमलदार  गवाणकर, संतोष पोकळे, इरफान पठाण, लालासिंग बावरी, सईद, विलास कदम, पावडे आणि शांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात नांदेड पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अशा अवैध हालचालींची माहिती नागरिकांनी पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!