नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतीय संरक्षण लेखा सेवेतील (IDAS) २०११ च्या तुकडीचे अधिकारी राहुल एकनाथ कराळे यांची दिल्ली विकास प्राधिकरणात (DDA) निर्देशक स्तरावर आयुक्त (कार्मिक / Personnel) पदी निवड करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) आदेशानुसार, सेंट्रल स्टाफिंग स्कीम अंतर्गत कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत त्यांची ही नियुक्ती मंजूर झाली आहे. रक्षा विभागाकडून त्यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी सुचवण्यात आले होते. कराळे यांना संरक्षण लेखा, आर्थिक व्यवस्थापन आणि लेखापरीक्षणाचा विस्तृत अनुभव असून त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कॉंगोमधील मोनुस्को (MONUSCO) शांती मोहिमेत तसेच भारतीय नौदलात आर्थिक सल्लागार म्हणून सेवा बजावली आहे.राहुल कराळे हे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांचे जावई आहेत. वास्तव न्यूज लाईव्ह राहुल कराळे यांना शुभकामना प्रेषित करीत आहे. Kanthak Suryatal Post Views: 474 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बॅरिकेड्स ओलांडून पोहोचली जनता: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत महाआक्रोश! १९४२ च्या आंदोलनाची पुनरावृत्ती! संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांची महामोर्चा!