नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या वाहतुक शाखेमध्ये दिवाळीच्या करंज्या, लाडू, चकली, चिवडा असे गोड पदार्थ जमा करण्याची पध्दत सुरूच आहे. सोबतच दहा मोदकांच्या बदल्यात रायडर त्याच ठिकाणी कायम काम करत आहेत.

पोलीस दलात कोणताही विभाग असेल त्यात एकूण नियुक्त असलेल्या सर्वच पोलीसांना सर्वच प्रकारची कामे आली पाहिजे असे अपेक्षीत असते. परंतू वाहतुक शाखेमध्ये काही ठरावीक कामे काही ठरावीक लोकच करत आहेत. त्यामध्ये रायडर 12 आहेत. त्यांना बदलले तर त्यासाठी दहा मोदके ठरलेले आहेत. दहा मोदके प्राप्त झाली की, रायडर तोच राहतो. अशा पध्दतीने या 12 रायडरचा गुणाकार प्रत्येकी 10 मोदकांसोबत वाचकांनी करावा.

सध्या दिवाळीचा सण सुरू आहे. त्यामुळे पोलीस अंमलदार ते अधिकारी झालेल्या व्यक्तीकडून एका चालकासोबत दिवाळीची मिठाई जमा करण्याचा कारभार सुरूच आहे. काही व्यापारी सांगतात की, आमुक व्यक्ती आला होता आणि तो दहा मोदक घेवून गेला आहे. नांदेड शहरात असलेल्या मॉलच्या मोदकांचा हिशोब तर वेगळाच आहे. याचे गणित करणे अवघड आहे.

नांदेड शहरात महाराणा प्रताप चौक आणि कै.वसंतराव नाईक चौक हे नामदेवाच्या नावाने लिहिलेले आहेत. या ठिकाणी एकाही गाडीवर मोटार वाहन कायद्याचा भंग केला म्हणून दंड आकारला असे घडलेच नाही असे सांगितले जाते. एकंदरीतच वाहतुक शाखेत सुरू असलेल्या मोदकांचा हा प्रकार, दिवाळी सणाच्या मिठाईचा प्रकार सुर्यपूत्राच्या अखत्यारीत सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!