बचावकार्यासाठी अनेक पथकांची 36 तासांची धडपड

नांदेड  (प्रतिनिधी) – दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दोन वाहनांमध्ये अडकलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस, जीव रक्षक दल आणि विविध मदत पथकांनी अथक परिश्रम घेतले. या संयुक्त प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालय, नांदेड येथे पाठविण्यात आला.

अपघाताचे स्वरूप अत्यंत विचित्र असल्याने मृतदेह दोन वाहनांमध्ये अडकला होता. तो बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या साहाय्याने प्रयत्न करण्यात आले. या बचावकार्यात अग्निशमन दल, पोलीस, हबीब भाई व त्यांचे जीव रक्षक दलातील सहकारी, गॅस कटरचे काम करणारे सत्तार भाई, होमगार्ड इमरान, महामार्ग पोलीस विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सत्तार, वाळके, कदम, अंगद सूर्यवंशी तसेच KTL कन्स्ट्रक्शन आणि शारदा कन्स्ट्रक्शनच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या कठीण बचावकार्यात विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करत मदतकार्य पूर्ण केले. मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. या अपघातामुळे परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न केले. अपघातस्थळी उपस्थित सर्व मदत पथकांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य पूर्ण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!