अर्धापूर / नांदेड (प्रतिनिधी) – राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील आसना पुलावर २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजताच्या सुमारास एक अत्यंत भीषण साखळी अपघात घडला आहे. या दुर्घटनेत एका भरधाव मालवाहू वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असून वाहतूक सुरळीत करणारे विमानतळ पोलीस ठाण्याचे हवालदार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेल्या १२ तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अपघाताची पार्श्वभूमी आणि घटनाक्रम २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हैदराबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनर (आरजे १४ जीएल ९२६८) आणि एका चारचाकी कारचालकामध्ये कट मारण्यावरून वाद झाला. या किरकोळ अपघातामुळे आसना पुलावर दोन्ही वाहने थांबल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी महामार्ग पोलिसांना कळवले, तर उपस्थितांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार व्यंकटेश आलेवार (बॅज क्र. ९८८) व इतर अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि रस्त्यावरील ट्रॅफिक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. मागून आलेल्या भरधाव ट्रेलरची जोरदार धडक पोलीस हवालदार आलेवार हे पुलावर कर्तव्य बजावत असतानाच, पाठीमागून लोखंडी गजाळ्या घेऊन येणाऱ्या भरधाव मल्टी-एक्सल मालवाहू वाहनावरील (जीजे ३९ टीए ७४२४) चालकाचे नियंत्रण सुटले. या वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून अत्यंत जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रेलरचा चालक दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडला जाऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात वाहतूक सुरळीत करणारे पोलीस हवालदार व्यंकटेश आलेवार यांच्या पायाला गंभीर मार लागला. त्यांना तात्काळ खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी यशोसाई हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १२ तासांपासून शर्थीचे रेस्क्यू ऑपरेशन अपघाताची तीव्रता अत्यंत भीषण असल्याने दोन्ही मालवाहू वाहने एकमेकांत अडकली होती. दोन्ही वाहनांच्या मध्ये फसलेल्या मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी रात्रभर अग्निशामक दल, क्रेन आणि पोलिसांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. सकाळी गॅस कटरच्या साह्याने पत्रे आणि सांगाडा कापून मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू राहिले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस प्रभारी अधिकारी विजय पाटील, पीएसआय जरार अहमद, अर्धापूर पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक एका बाजूने सुरळीत करण्यात आली आहे. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-29-at-09.31.38.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/WhatsApp-Video-2026-10-29-at-09.31.36.mp4 Kanthak Suryatal Post Views: 248 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नांदेड शिख गुरुद्वारा बोर्ड पुनस्थापित; महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी अभूतपूर्व! अलाहाबाद हायकोर्टात जजांच्या आसनाकडे फेकून मारल्या खुर्च्या अन् जोडे; कोर्टरूमची प्रचंड तोडफोड!