भोकर न्यायालयाचा आदेश; १२ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप भोकर (प्रतिनिधी) – शेतजमिनीचा कायदेशीर फेरफार करण्यासाठी शेतकऱ्याकडे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून तलाठ्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुक्यातील चिदगिरी येथील तलाठी सज्जा कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी साहेबराव हैबती टोमके (वय ५३) यांच्याविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७१/२६ दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. शेतजमिनीचा फेरफार कायदेशीररीत्या करून देण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडून १२ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आणि त्यापैकी ५ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप तलाठ्यावर आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. Kanthak Suryatal Post Views: 372 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लातूरात वाळू उपसा, मटका व जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी कुठे बंद आहे हो वाळूचा कारभार? वजीराबादच्या हृदयातच वाळूचा खुला दरबार!