नांदेड (प्रतिनिधी) – महिला सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नांदेड शहर पोलीस दलातील भाग्यनगर पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि धडाडीने कारवाई करत एका गंभीर गुन्ह्यात अवघ्या २४ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. घटना काय घडली? दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पीडित अल्पवयीन बालिका तिच्या भावासोबत शाळेतून घरी परत येत होती. त्यावेळी आरोपी नंदकिशोर लक्ष्मण पंढरी, वय २० वर्षे, रा. संभाजीनगर, कंधार, जि. नांदेड याने बालिकेचा वारंवार पाठलाग करून तिचा रस्ता अडवला आणि मला तू आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला. तत्काळ गुन्हा दाखल व कारवाई: या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम ७८ आणि पोक्सो अधिनियमाचे कलम १२ अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड यांच्याकडे सोपवण्यात आला. २४ तासांत तपास पूर्ण व चार्जशीट दाखल: तपास अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला तत्काळ अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करण्यात आला. महत्त्वपूर्ण साक्षीदारांची चौकशी करून कलम १८३ बी.एन.एस.एस. अन्वये त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपीची नांदेड कारागृहात रवानगी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सर्व आवश्यक तांत्रिक व कागदोपत्री पूर्तता अवघ्या २४ तासांच्या आत पूर्ण करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मार्गदर्शन व पोलीस पथक: ही धडाकेबाज कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.या कारवाईत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, तपास अधिकारी पोउपनि साहेबराव कसबेवाड आणि पोलीस शिपाई पांचाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. Kanthak Suryatal Post Views: 63 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इतवारा पोलिसांना सापडला मोबाईल; संबंधित व्यक्तीने संपर्क साधण्याचे आवाहन सीमेवर रणकंदन आणि दिल्लीत मौन! ITBP महासंचालकांच्या खुलाशाने सरकारची पोलखोल; अरुणाचल प्रदेशात चीनचे सैनिक ६ किलोमीटर आत!