नांदेड (प्रतिनिधी) – जपान मध्ये आज झालेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदकावर भारताचे नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्या २५ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३६ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. सन २०२१ मध्ये टोकिओ व २०२४ मध्ये पॅरिस येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे सौभाग्य त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा ध्वजवादक होण्याचा बहुमान भाग्यश्री जाधव यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच त्यांची मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी- वर्ग एक या पदावर नियुक्ती दिली आहे. जपान मधील आयची नागोया येथे आज दि, १८ ऑक्टोंबर २०२६ रोजी झालेल्या एशियन पॅरा गेम्स् या स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात ८.१९ मिटर गोळाफेक करून दुसरा क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक मिळविले आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची दुसऱ्यांदा संधी भाग्यश्री जाधव यांना प्राप्त झाली होती.विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव ह्या महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहेत.त्यांनी या संधीचे सोने करून दाखविले आहे.या स्पर्धेतील गोळाफेक भाग्यश्री जाधव यांच्या क्रीडा प्रवासातील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. माझे मुख्य प्रशिक्षक सी. सत्यनारायण, सह प्रशिक्षिका श्रीमती पुष्पा मॅडम, प्रशिक्षक प्रशांत वाघ, गुरुबंधू पत्रकार प्रकाश कांबळे, सेवानिवृत्त जिल्हा नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर व प्रसिद्ध व्यापारी शशिकांत पाटील जुन्ने बेळीकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा तसेच डॉक्टर मंडळी,प्रसार माध्यमातील सर्व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे मला हे यश प्राप्त करता आले.अशी प्रतिक्रिया भाग्यश्री जाधव यांनी जपान येथून माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 103 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १४ व १७ वर्षांखालील शालेय पदकविजेत्या खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा!ऑलम्पिक असोशियन ची मागणी