नांदेड (जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2026-27 उत्साहात संपन्न झाली. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात 12 व 13 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. चढाई आणि पकडीच्या अटीतटीच्या लढतींमुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण झाली. या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त जनार्दन गुपीले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव अजगरअली पटेल, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, रामन बैनवाड, जिल्हा टेनिक्वॉईट संघटनेचे प्रतिनिधी शेनेवाड, जिल्हा पुरस्कारप्राप्त डॉ. राहुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा गटवार निकाल पुढीलप्रमाणे आहे. 14 वर्षांखालील मुले : प्रथम – श्री संत गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय, लोहा; द्वितीय – कै. गोविंदराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वझरा, ता. माहूर; तृतीय – माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड. 14 वर्षांखालील मुली : प्रथम – शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर; द्वितीय – माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड; तृतीय – जयराम अंबेकर विद्यालय, अर्जापूर, ता. बिलोली. 17 वर्षांखालील मुले : प्रथम – माध्यमिक आश्रमशाळा, गांधीनगर, ता. कंधार; द्वितीय – आंतरभारती माध्यमिक विद्यालय, बिलोली; तृतीय – ग्रीनफिल्ड नॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, रामेश्वर, ता. धर्माबाद. 17 वर्षांखालील मुली : प्रथम – अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, साळवाडी, ता. भोकर; द्वितीय – माध्यमिक आश्रमशाळा, कमळेवाडी, ता. मुखेड; तृतीय – साधना हायस्कूल, देगलूर. 19 वर्षांखालील मुले : प्रथम – शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारखणी, ता. किनवट; द्वितीय – पानसरे महाविद्यालय, अर्जापूर, ता. बिलोली; तृतीय – शासकीय आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर. 19 वर्षांखालील मुली : प्रथम – शासकीय आश्रमशाळा, दुधड, ता. हिमायतनगर; द्वितीय – आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मनाठा, ता. हदगाव; तृतीय – श्री दत्त ज्युनिअर कॉलेज, नायगाव. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. शालेय खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना प्रोत्साहन देणे आणि कबड्डी खेळाचा विकास साधणे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी अजगरअली पटेल, सबदर पटेल, जीवन पवार, पी. एस. चव्हाण, बन सर, रमन बैनवाड, नवनाथ पोटफोड, सफदर पटेल, पुरुषोत्तम पाटील, अशफाक, सिद्धांत कांबळे, सय्यद ईसा, साईनाथ नामवाडे, अरविंद, प्रियंका पालमवार, कृष्णा चप्पेवार, एस. कबीर आणि याकब अरसलान यांनी पंच म्हणून काम पाहिले. जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धाप्रमुख बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, दत्तकुमार धुतडे, रोहिणी घंटेवाड यांच्यासह संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळ, यश कांबळे तसेच जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी व खेळाडूंनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. ******* Kanthak Suryatal Post Views: 100 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation १४ व १७ वर्षांखालील खेळाडूंचे ५% क्रीडा आरक्षण कायम ठेवा!;शासन निर्णयाच्या निषेधार्थ जीआरच्या प्रतीची होळी; जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन