अर्धापूर तालुक्यातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्धापूर (प्रतिनिधी) –  अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजेपासून ते १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत चामरा, ता. अर्धापूर येथे ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी आरुणाबाई विलास खंदारे (वय ४२ वर्षे, रा. चामरा, ता. अर्धापूर) यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ५६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(२) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी पोलीस अंमलदार ढवळे करीत आहेत. परिसरात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांनी घराच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!