दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांचा डल्ला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल रामतीर्थ (प्रतिनिधी) – नायगाव तालुक्यातील दत्तनगर नरसी येथे अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरुबाई गोविंदराव शिरळे (वय ४४, रा. दत्तनगर नरसी, ता. नायगाव) यांच्या राहत्या घरी ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सरुबाई शिरळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३) व ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. भरदिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. Kanthak Suryatal Post Views: 24 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई; ५ हायवा ट्रकांसह दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त शेतातील सोयाबीन पिकाला आग लावून १ लाख ७५ हजारांचे नुकसान