संभाजीनगर नगरातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल तामसा (प्रतिनिधी) – तामसा ते हदगाव मार्गावरील संभाजीनगर नगर परिसरात घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर नगर, तामसा ते हदगाव येथील रहिवासी बालाजी बापूराव चंदनवार (वय ४७ वर्षे) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बालाजी बापूराव चंदनवार यांनी तामसा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खेडकर करीत आहेत. परिसरात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. Kanthak Suryatal Post Views: 119 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने ६ लाख ८० हजारांची फसवणूक नांदेड पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई; ५ हायवा ट्रकांसह दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त