नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – फातिमा गर्ल्स हायस्कूलच्या पाठीमागे गाडेगाव रोड परिसरातील एका घराचा दरवाजाचा कूलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.३० ते दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी मोहम्मद अहमद खान फकीर खान (वय ४५, रा. फातिमा गर्ल्स हायस्कूलच्या पाठीमागे, गाडेगाव रोड, नांदेड) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ठेवलेले सोन्याचे दागिने असा एकूण ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. १२९२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४), ३०५ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार मुंडे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 101 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation प्रवासी महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; दोन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल;नांदेड ग्रामीण व माहूर पोलिसांची कारवाई; लाखोंचा ऐवज लंपास