तामसा –  हदगाव तालुक्यातील कांडळी बु. येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपासून २ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने फिर्यादी साईनाथ दिगंबरराव बहिरवाड (वय ३८, रा. कांडळी बु., ता. हदगाव) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.या प्रकरणी साईनाथ बहिरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१(४) व ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास तामसा पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!