मुदखेड (प्रतिनिधी) रोहिपिंपळगाव जाणाऱ्या रस्त्यावर पायी जात असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणाला मुदखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास शंकर नगर ते रोहिपिंपळगाव जाणाऱ्या रोडवर फिर्यादी निलाबाई गणपती मदनवाड (वय ६५, रा. रोहिपिंपळगाव, ता. मुदखेड) या पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी संदेश अर्जुन काळे (वय २०) याने एका विधिसंघर्षग्रस्त बालकासोबत संगनमत करून मोटारसायकलवरून येत त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत असून आरोपी ताब्यात आहे. रावणगाव शिवारात ४८ हजारांची ॲल्युमिनियम तार चोरी वीजवाहिनीच्या कामादरम्यान अज्ञात चोरट्यांचा डाव मनाठा : पांगरी ते रावणगाव जाणाऱ्या रोडवर रावणगाव शेतशिवारात वीजवाहिनीचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम तार चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ३० सप्टेंबर रोजी रात्री १०.३० ते १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० या कालावधीत हा प्रकार घडला. ३३ के.व्ही. लाईनचे काम सुरू असताना लाईटचे पोलवर ओढलेली ॲल्युमिनियम तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी संदीप जानकीराम राऊत (वय ४१, रा. पळसा, ता. हदगाव) यांच्या तक्रारीवरून मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९०/२०२६, कलम ३०३(२) बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि बनसोडे करीत आहेत. प्रॉपर्टीच्या आमिषाने २० लाखांची फसवणूक तरोडा नांदेड येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल भाग्यनगर : प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीकडून तब्बल २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ सप्टेंबर २०२२ ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भाग्यनगर परिसरातील भावसार चौक, महाराष्ट्र ग्रामीण बँक व दयासागर नगरी, तरोडा नांदेड येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपी संतोष पुरुषाजी शिंदे (वय ५०, रा. तरोडा, नांदेड) याने प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून २० लाख रुपये घेतले. मात्र, रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फिर्यादी शिवदयाल नंदलाल तिवारी (वय ६३, रा. पारसनगर, नांदेड) यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६८/२०२६ अन्वये बीएनएसच्या कलम ३१८(४), ३१६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोउपनि महाजन करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 49 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास;कांडळी बु. येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध तामसा पोलिसांत गुन्हा दाखल