बाल्टिक समुद्रात अण्वस्त्रांचा उद्रेक आणि युरोपच्या विनाशाची अंतिम घंटी! युरोपच्या उंबरठ्यावर महायुद्धाची काळी सावली रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने आता केवळ पूर्व युरोपपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपीय खंडाला आपल्या भयानक लपेटीत घेण्यास सुरुवात केली आहे. नाटो देशांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि रशियाविरोधात आवळल्या जाणाऱ्या पाशामुळे मॉस्कोचा संताप आता अनावर झाला असून रशियाने थेट अण्वस्त्रांचा चॅप्टर उघडण्याची उघडउघड घोषणा केली आहे. युरोपीय नाटो राष्ट्रांनी क्षेपणास्त्रांचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेताच रशियाने त्याला थेट युद्धाची धमकी मानून बाल्टिक क्षेत्रात परमाणू वादळाचा गंभीर इशारा दिला आहे. नाटोच्या या चिथावणीखोर आणि गैरजबाबदार भूमिकेमुळे संपूर्ण युरोपमध्ये विनाशाची घंटा वाजू लागली आहे. रशियाचा आक्रमक मिजाज पाहता, बाल्टिक समुद्र आता केवळ एक जलमार्ग राहिला नसून युरोपीय सुरखेचा सर्वात धोकादायक आणि स्फोटक मोर्चा बनला आहे. कालिनीनग्राड: रशियाचा अण्वस्त्र गड आणि नाटोचा पोटशूळ बाल्टिक देशांच्या अगदी उघड्या डोळ्यांसमोर रशियाचा कालिनीनग्राड हा एक अत्यंत संवेदनशील आणि मोक्याचा भूप्रदेश स्थित आहे, जो पोलंड आणि लिथुआनियाच्या मध्ये वेढलेला आहे. हा परिसर रशियन बाल्टिक नौदलाचा मुख्य अड्डा असून येथे परमाणू क्षमता वाहून नेणारी अत्याधुनिक इस्कंदर क्षेपणास्त्रे आणि भक्कम एअर डिफेन्स सिस्टिम आधीपासूनच तैनात आहे. नाटोच्या पूर्व सीमेवरील हा सर्वात धोकादायक केंद्रबिंदू मानला जातो. रशियाने नाटोवर उघड आरोप केला आहे की, नाटो कालिनीनग्राडची हवाई आणि सागरी नाकेबंदी करण्याची गुप्त तयारी करत आहे. यावर रशियाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत नाटोला अंतिम इशारा दिला आहे की, जर बाल्टिक समुद्राला लागून असलेल्या कालिनीनग्राडचा मुख्य रशियन भूमीशी असलेला संपर्क तोडण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न केला गेला, तर रशिया आपल्या अण्वस्त्रांचा वापर करण्यास किंचितही मागेपुढे पाहणार नाही. दुसरीकडे, पोलंडने अमेरिकन पेट्रियट एअर डिफेन्स सिस्टिमसाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचे उत्पादन स्वबळावर आपल्याच जमिनीत सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पोलंडच्या या आक्रमक पाऊलाने रशियाच्या संतापात तेल ओतले असून, युरोपमधील या शस्त्रनिर्मिती कारखान्यांचा एकमेव उद्देश युद्ध भडकवणे हाच आहे, असा थेट आरोप मॉस्कोने केला आहे. कपस्टिन यारची चाचणी आणि लावरोव्ह यांचा सणसणीत इशारा नाटोच्या चिथावणीला चोख प्रत्युत्तर म्हणून रशियाने आपले लष्करी सामर्थ्य दाखवण्यास सुरुवात केली आहे. अस्त्रखान प्रदेशातील कपस्टिन यार या आपल्या प्रसिद्ध क्षेपणास्त्र चाचणी क्षेत्रावरील हवाई हद्द ३ ऑक्टोबरपर्यंत दररोज १० तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. कपस्टिन यारचा वापर रशिया प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसाठी करतो. या चाचण्यांच्या माध्यमातून रशियाने जगाला स्पष्ट संदेश दिला आहे की कालिनीनग्राडमधील अण्वस्त्रांसह आपल्या ताकदीतील सर्व प्रकारच्या लष्करी क्षमतांचा वापर करण्यास मॉस्को पूर्णपणे सज्ज आहे. रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पोलंड आणि नाटो देशांना सणसणीत इशारा देताना थेट शब्दांत सुनावले आहे की, नाटो देशांनी रशियाच्या सुधारित अण्वस्त्र धोरणाचे नियम जरा नीट वाचून घ्यावेत. लावरोव्ह यांच्या या विधानाने संपूर्ण युरोपीय राष्ट्रांची झोप उडवली आहे. पुतिन यांची सुधारित अण्वस्त्र संहिता: युद्धशास्त्राचे नवे नियम रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये रशियाच्या अण्वस्त्र संहितेत अत्यंत महत्त्वाचे आणि घातक बदल केले होते. या नव्या संहितनुसार अण्वस्त्र वापराचे निकष पूर्णपणे बदलले गेले आहेत: १. संयुक्त हल्ल्याची व्याख्या: जर युक्रेनसारखा कोणताही बिगर-अण्वस्त्रधारी देश अमेरिका किंवा नाटोसारख्या अण्वस्त्रधारी महासत्तेच्या मदतीने किंवा पाठिंब्याने रशियावर हल्ला करतो, तर त्याला त्या दोन्ही देशांचा संयुक्त लष्करी हल्ला मानले जाईल. २. पारंपरिक शस्त्रांवर अण्वस्त्र प्रत्युत्तर: जर रशिया किंवा त्याचा मित्रदेश बेलारूस यांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला पारंपरिक शस्त्रांमुळे (जसे की क्षेपणास्त्रे, ड्रोन किंवा लढाऊ विमाने) गंभीर धोका निर्माण झाला, तर रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवतो. ३. बेलारूसला अण्वस्त्र छत्र: या सुधारित संहितेद्वारे बेलारूसला अधिकृतपणे रशियाच्या अण्वस्त्र छत्राखाली समाविष्ट करण्यात आले आहे. या नियमांमुळे आता नाटो देशांना युक्रेनच्या पाठीमागे लपून युद्ध खेळणे अशक्य झाले आहे. कोणताही पारंपरिक हल्ला हा थेट अण्वस्त्र युद्धाची नांदी ठरू शकतो, हे पुतिन यांनी नियमावलीत स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. हायब्रिड वॉरफेअर आणि ४० किलोचा विनाशकारी ड्रोन कट रशिया केवळ अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन थांबलेला नाही, तर प्रत्यक्ष युद्धभूमीतही त्याने विनाशकारी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. रशियाने आपल्या जेट-पावर्ड ड्रोन सिस्टिममध्ये अत्यंत घातक असे नवे शस्त्र समाविष्ट केले आहे. यात ४० किलोग्रॅम वजनाचा विशेष स्फोटक चार्ज जोडण्यात आला आहे, जो हाय-व्होल्टेज विजेचे खांब आणि लोखंडी पूल क्षणात तोडण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. युक्रेनचे पॉवर ग्रिड आणि नागरी पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात ढकलणे हा रशियाचा उघड हेतू आहे. निष्कर्ष: एका छोट्या चुकीने संपूर्ण युरोप खाक होणार? सध्या बाल्टिक समुद्राच्या परिसरात परिस्थिती अत्यंत नाजूक आणि स्फोटक टप्प्यावर पोहोचली आहे. हायब्रिड वॉरफेअर, हवाई क्षेत्राचा लष्करी वापर आणि उघडउघड टेबलवर ठेवलेला अण्वस्त्रांचा पर्याय यामुळे युरोप विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या तणावपूर्ण वातावरणात नाटो किंवा रशियाकडून झालेली एक छोटीशी गैरसमजूत किंवा चूक संपूर्ण युरोपला महायुद्धाच्या भीषण आगीत लोटू शकते. रशियाचा संदेश स्पष्ट आहे युक्रेनच्या माध्यमातून नाटोने आपल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास, रशिया जगाला अण्वस्त्रांच्या ज्वालांमध्ये जाळण्यास मागेपुढे पाहणार नाही. नाटोने आपल्या चिथावणीखोर चाली थांबवल्या नाहीत, तर युरोपचा विनाश अटळ आहे! Kanthak Suryatal Post Views: 61 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ५० किमी लांब धुराचे लोट अन् पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा उद्रेक! इराणच्या महाहल्ल्याने जगात हाहाकार!