नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन केले. पण या आंदोलनाच्या उत्तरात जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, काही ठिकाणी यांच्या पोलींग एजंटला समस्या झाली. परंतू आता ती पुर्णपणे दुरूस्त करण्यात आली आहे.
आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गाडी उभी करण्याच्या वाहनतळात बसून आंदोलनाच्याद्वारे आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, प्रशासन बीजेपी आणि कॉंगे्रसच्या सोबत मिळून आहे. प्रशासन बीजेपीच्या दावणीला बांधलेले आहे. सर्व मोदींचे चमचे आहेत. माझ्या पोलींग एजंटांना मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून मी नांदेड जिल्हा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याची तक्रार भारताच्या मुख्य निवडणुक आयुक्तांकडे करणार आहे. मी तक्रार केली तेंव्हा रात्री निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वारी..स्वारी.. असे म्हणत दुरूस्ती करतो असे सांगितले होते.
या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जाहीर करतांना निवडणुक निर्णय अधिकारी अभिजित राऊत म्हणाले की, आम्ही कोणाचेही नाहीत. आम्ही पुर्णपणे पारदर्शक काम करत आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या पोलींग एजंटला 95 टक्के जागांवर काहीच समस्या आली नाही. फक्त 5 टक्के जागांवर काही समस्या आल्या आहेत. त्या आता मी खुलासा देण्याअगोदरपर्यंत त्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.