नवी दिल्ली (प्रतिनिधी) -स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा केली आहे. या यादीत महाराष्ट्राने आपली मोहोर उमटवली असून, राज्याला विविध श्रेणींमध्ये एकूण ८२ पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये पोलीस दलासाठी ६०, अग्निशमन सेवेसाठी १५, होमगार्डसाठी ३ आणि सुधार सेवांसाठी ४ पदकांचा समावेश आहे.
देशभरात एकूण ३०१ शौर्य पदके (GM), ९२ राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदके (PSM) आणि ६६४ गुणवत्तापूर्ण सेवा पदके (MSM) प्रदान करण्यात आली आहेत.
राज्यनिहाय पोलीस पदक संख्या (निवडक राज्ये):
| राज्य/केंद्रशासित प्रदेश | शौर्य पदक (GM) | राष्ट्रपती विशिष्ट सेवा (PSM) | गुणवत्तापूर्ण सेवा (MSM) | एकूण |
|---|---|---|---|---|
| महाराष्ट्र | २० | ०३ | ३७ | ६० |
| छत्तीसगड | १४१ | ०१ | १० | १५२ |
| उत्तर प्रदेश | १२ | ०६ | ७५ | ९३ |
| जम्मू आणि काश्मीर | ३८ | ०१ | १३ | ५२ |
| आंध्र प्रदेश | ०७ | ०२ | १४ | २३ |
| गुजरात | ०० | ०२ | १७ | १९ |
महाराष्ट्रातील पदक विजेत्यांची संपूर्ण नामावली
- शौर्य पदक (GM): १. राजू पांडुरंग गवळी (पोलीस उपनिरीक्षक) २. वासुदेव राजम मडावी (पोलीस उपनिरीक्षक – १st Bar to GM) ३. दिलीप विठ्ठल आत्राम (नाईक पोलीस कॉन्स्टेबल) ४. अजय गोपाळराव मडावी (पोलीस कॉन्स्टेबल) ५. गणेश चंद्रम दुब्बुला (पोलीस कॉन्स्टेबल) ६. विजय झुरू मडावी (पोलीस कॉन्स्टेबल) ७. भूपेश मारोतराव जुमनाके (पोलीस कॉन्स्टेबल) ८. दलसू काटिया बोगामी (पोलीस कॉन्स्टेबल) ९. राजेश शामराव किरंगे (पोलीस कॉन्स्टेबल) १०. मासा बोरा आत्राम (नाईक पोलीस कॉन्स्टेबल) ११. यतीश विजयराव देशमुख (अतिरिक्त पोलीस अधीक्षक) १२. विजय किष्टय्या कोडपे (हेड कॉन्स्टेबल) १३. दशरथ रामशहा मडावी (नाईक पोलीस कॉन्स्टेबल) १४. राकेश राजम बेडकी (पोलीस कॉन्स्टेबल) १५. सुधाकर जगन पोरटेट (पोलीस कॉन्स्टेबल) १६. श्रीनिवास समय्या निशतुरी (पोलीस कॉन्स्टेबल) १७. गणेश हनुमंतू गंजीवार (पोलीस कॉन्स्टेबल) १८. नितेश प्रभुदास टेंभेकर (पोलीस कॉन्स्टेबल) १९. शिवाजी मेसो हिचामी (पोलीस कॉन्स्टेबल) २०. संजय मलेश कंकबंदावार (पोलीस कॉन्स्टेबल)
- राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक (PSM): १. श्री. शिरीष रवींद्र जैन (अतिरिक्त महासंचालक) २. श्री. सुभाष नानासाहेब भुजंग (उप पोलीस अधीक्षक) ३. श्री. संजय राजाराम वायचळे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक)
- गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM): संजय बाजीराव जाधव (DIG), विजयकुमार गोपीनाथ मगर (DIG), दिगंबर पांडुरंग प्रधान (SP), प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी (DySP), भागीरथ शिवाजी देशमुख (DySP), प्रवीण विनायक तेजाळे (DySP), मनोजकुमार माधवराव यादव (DySP), वैभवकुमार जगदवोराव जाधव (निरीक्षक), संतोष मानसिंग बर्गे (निरीक्षक), विश्वजीत वसंत काईंगडे (निरीक्षक), जितेंद्र आनंद कदम (निरीक्षक), जनार्दन यशवंत देसाई (उपनिरीक्षक), अंकुश बालाल न्यायनिर्गूणे (ASI), विलास हनुमंतराव इंगळे (ASI), मुजफ्फर अली जाफर अली सय्यद (ASI), विनोद प्रभाकर पाटील (निरीक्षक), दिलीप भीमा धुमणे (उपनिरीक्षक), मोहन अण्णासाहेब सौंदत्ती (ASI), दीपक अनंत ठाकूर (उपनिरीक्षक), संपत मुरलीधर खैरे (ASI), गुलाब प्रभाकर सोनार (ASI), शेखर दशरथ फरताळे (ASI), शेरखान दिलावरखान पठाण (ASI), सुनील निवृत्ती कदम (ASI), प्रकाश बळीराम कदम (उपनिरीक्षक), चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर (उपनिरीक्षक), दिनेश विश्वनाथ बडगुजर (उपनिरीक्षक), अरुण पत्रुजी आत्राम (ASI), शिवानंद महादेव स्वामी (ASI), पांडुरंग बाप्पाजी पाटील (ASI), अनवरअली सय्यदअली सय्यद (ASI), गणेश शंकर शिंदे (ASI), मनोज गोपाळराव मंगरुळकर (ASI), प्रदीप वसंतराव चौगावकर (निरीक्षक), भरत खिमजी गोहिल (हेड कॉन्स्टेबल), राजकुमार यादोराव जनबंधू (हेड कॉन्स्टेबल)
अग्निशमन सेवा (Fire Service)
- शौर्य पदक (GM): मनोज विश्वनाथ सावंत, रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, अनिल वसंत परब, ईश्वर खंडू कांबळे, योगेश हिरालाल पवार, दत्तात्रय अशोक भोसले, महेश आनंद गुडुलकर, चिंतामणी शिवाजी खांडेकर, विकी नागेश सरवदे, सुदर्शन घनश्याम पावडे, रमेश जीवन कोळी, राजेश विष्णू राणे, हर्षल शंकर कटके.
- गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM): शंकर उत्तम मिसळ, शैलेश महादेव जगताप.
होमगार्ड आणि नागरी संरक्षण (Home Guard & Civil Defence)
- गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM): पोपट रामजी सांगडे, अशोक नामदेव इंगळे, मनोज सदाशिव बारसागडे.
सुधार सेवा (Correctional Services)
- राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक (PSM): श्री. संजीव सखाराम घाणेकर (सुभेदार), श्री. संजय राजारामजी तलवारे (हवालदार)
- गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM): विकास हनुमंतू राजनलवार, महेश लक्ष्मण गडनाईक
वाचकांच्या सोयीसाठी पदक प्राप्त सर्व नावांची पीडीएफ संचिका सोबत जोडली आहे….
