धर्माबाद (प्रतिनिधी) – धर्माबाद तालुक्यात अनुदानित रासायनिक युरिया खताची अवैध वाहतूक व जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येत असलेल्या खतावर धर्माबाद पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत एकूण १३५ युरिया खताच्या बॅगा जप्त केल्या. या कारवाईत सुमारे २ लाख ७० हजार ६०७ रुपयांचा खतसाठा तसेच वाहने ताब्यात घेण्यात आली असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.५० वाजता सायखेड फाट्यानजीक बोलेरो पिकअपमधून ६५ युरिया खताच्या बॅगा (किंमत १,३०,२९२ रुपये) वाहतूक करताना आरोपींना पकडण्यात आले. या प्रकरणी कृषी अधिकारी विशाल वसंतराव चंदापुरे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कराड करीत आहेत. दुसऱ्या कारवाईत २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता यवळ (ता. धर्माबाद) येथे टेम्पोमधून ७० युरिया खताच्या बॅगा (किंमत १,४०,३१५ रुपये) अवैधरीत्या वाहतूक करताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणीही कृषी अधिकारी विशाल चंदापुरे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध रासायनिक खत (नियंत्रण) आदेश १९८५, आवश्यक वस्तू अधिनियम १९५५, फर्टिलायझर (मुव्हमेंट कंट्रोल) ऑर्डर १९७३ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 648 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घरफोडीत दीड लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास श्रीकांत वारे यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव