या प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार झाडे करीत आहेत.
एमआयडीसी परिसरातून चेकर्ड प्लेट चोरी
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी वजिराबाद परिसरातील जय कॉर्प लिमिटेड कंपनीतून ८ हजार रुपये किमतीच्या चार चेकर्ड प्लेट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी गड्डम पुरुषोत्तम रेड्डी (वय ६३, रा. नांदेड) यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ९१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार सावनकर करीत आहेत.
