नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि मांडवी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट देयके तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. हदगाव येथील शासकीय रुग्णालयात डॉ. संदीप हनुमंतराव दरबस्तवार आणि संतोष सोत्रप्पा दरगू दोये यांनी संगनमत करून बनावट देयके तयार करून कोषागार कार्यालयात सादर केली. या माध्यमातून ₹44 लाख 12 हजार 500 रुपयांचा शासकीय निधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करून अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात बीएनएस-2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात किनवट तालुक्यातील मांडवी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम दासराव राठोड यांनी सेवाार्थ प्रणालीतील माहितीमध्ये फेरफार करून जून 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीतील वेतनाची बनावट देयके तयार केली. ही देयके कोषागार कार्यालयात सादर करून ₹3 कोटी 20 लाख 99 हजार 953 रुपयांचा शासकीय निधी अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेके यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,355 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation लोकसभेत राहुल गांधींचा परीक्षा सुधारणा विधेयकावर कडाडून हल्ला; विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त व्याख्येवरून सभागृहात जोरदार गदारोळ हिंसेचे बौद्धिक समर्थन आणि लोकशाहीचा गळाघोट: टीजी मोहनदास या विकृतीचा पंचनामा