नांदेड शहरात मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना; घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) –  नांदेड शहरात मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना घडल्या असून, स्वतंत्र प्रकरणांमध्ये नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही घटनांतील आरोपी ताब्यात असून अटकेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहिल्या घटनेत 25 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चंदासिंग कॉर्नर महिला शोरूमजवळ फिर्यादी शेख समीर शेख नजीर (रा. आलूरगाव, ता. नायगाव) यांच्याकडील सुमारे 15 हजार रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास याच परिसरात महेबूब पठाण सुलेमान पठाण (रा. मुजामपेठ, नांदेड) यांच्याकडील 6 हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेला. या प्रकरणाचाही तपास नांदेड ग्रामीण पोलिस करत आहेत.

दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत नगर येथे 25 जुलै रोजी घरात प्रवेश करून अज्ञात महिलेने 2 लाख 51 हजार 400 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली. फिर्यादी उपा सुरेश गवळी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!