देगलूर (प्रतिनिधी) – देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयातील वेतन वितरणात कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुमारे 89 लाख 70 हजार 150 रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जुलै 2021 ते 15 जुलै 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून वेतन नोंदी सेवा प्रणालीमध्ये खोटी देयके तयार केली. त्यानंतर सहाय्यक कोषागार कार्यालयात बनावट देयके सादर करून संबंधित रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक नरेश देवणीकर, वरिष्ठ लिपिक रावसाहेब मोरे, प्रयोगशाळा सहाय्यक शिवाजी पवार, अधिपरिचारिका माधव मगर आणि कनिष्ठ लिपिक दिगंबर मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील संजय माणिकराव पेरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 359/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 642 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त नांदेड शहरात मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना; घरफोडीत अडीच लाखांचा ऐवज लंपास