अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील समर्थ सुभाष जानकर व श्रीकांत सुभाष जानकर यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत समर्थ यांनी ५२० गुण घेऊन तर श्रीकांत जानकर यांनी ५६३ गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. बादोल्यासारख्या ग्रामीण भागातील एका सर्व सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या या दोन्ही जानकर बंधुनी बादोले गावचे नाव तालुक्यात झळकाविले असून त्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यानी अभिनंदनाचा वर्षाव तसेच कौतुक केले आहे. एकाच घरातील दोन बंधू एकाचवेळेस नीट परीक्षेत यश मिळविण्याची किमया त्यांनी केले आहे. आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या आई आणि वडीलांना अत्यानंद झाला आहे. कठोर परीश्रम, वेळेचे बंधन, ध्येय, जिद्द, चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगितले. आजच्या तरुणांनी मोबाईलकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करुन आपल्या आई वडीलांचे तसेच कुटुंबाचे नाव लौकिक करावे असे आवाहन श्रीकांत व समर्थ जानकर यांनी केले.
More Related Articles
26 मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शंखनाद सभा-खा.अशोक चव्हाण
नांदेड(प्रतिनिधी)- भारताचे गृहमंत्री अमित शाह हे नागपूर-नांदेड अशा तिन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून 26…
नो किंग्स’चा हुंकार: अमेरिकेत तानाशाही विरोधात जनतेचा एल्गार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज आपला वाढदिवस साजरा करत असताना, सैन्य स्थापनेच्या २५० वर्षांच्या निमित्ताने…
मी माझा जीव देईन! – जेव्हा निवडणूक आयोगाच्या सन्मानासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग ढसाढसा रडले
सत्ता आणि नैतिकता: मनमोहन सिंग, मोदी आणि निवडणूक आयोगाच्या बदललेल्या भूमिकेचा हा धक्कादायक प्रवास लोकशाहीची…
