चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष!
नांदेड- जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधतो. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण आणि पुनरुत्पादन आणि कौटुंबिक जीवनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे याची खात्री करण्याची आपली सामूहिक जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी जवळा दे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, मनिषा गच्चे, संभाजी गवारे, सुषमा गोडबोले, अर्चना शिखरे आदिंची उपस्थिती होती.
आता जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. तर उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील जनगणनेदरम्यान देशातील सुमारे १८ टक्के लोकसंख्या वाढली आहे. जर भारताची लोकसंख्या याच वेगाने वाढली असण्याची शक्यता आहे. येत्या दोन वर्षांत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. असे झाले तर देशात अन्न संकट, बेरोजगारीचे संकट, वैद्यकीय आणि आरोग्य संकट, जलसंकट मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. स्थलांतर, उपासमार यामुळे लोक हतबल होतील. नैसर्गिक समतोल भंग केल्यास भयंकर नैसर्गिक आपत्तींचा धोका निर्माण होईल, अशी माहिती मुख्याध्यापक ढवळे यांनी दिली. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात ११ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत ‘जागतिक लोकसंख्या दिन’ सप्ताह राबविण्यात येत आहे. यावर्षीच्या मोहिमेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे ‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सुदृढ निरंतर’ हे मुख्य घोषवाक्य तयार करण्यात आले असल्याची माहिती बेंबडे यांनी दिली
