डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक पदी रुजू
भोकर,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी आज दि. ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे सकाळी भेट दिली विविध विभाग यांना भेट देऊन पाहणी केली कामा बदल समाधान व्यक्त केले. डायलिसिस विभाग त्वरित कार्यान्वित करण्यात यावा गरजू रुग्णांना सेवा देण्यात यावी अशी सुचना केली. तसेच नविन उप जिल्हा रुग्णालय बांधकाम यांची पाहणी केली.
डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांचा प्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ प्रताप चव्हाण हे नियमीत वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुजू झाले बदल त्यांचा डॉ भोसीकर यांनी सत्कार केला.
सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला काही सुचना व रुग्णांना वेळेवर सेवा देण्यात यावी अशी माहिती डॉ विद्या झिने मॅडम यांनी दिली. सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.
यावेळी जिल्हा समन्वयक सचिन कोत्ताकोंडवार, वैद्यकीय अधिकारी डॉ अनंत चव्हाण, डॉ नितीन कळसकर, डॉ सारिका जावळीकर, डॉ शिल्पा गरुडकर, डॉ क्षेया आगलावे, डॉ मंगेश पवळे, डॉ सागर रेड्डी,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ मुद्दशीर, डॉ विजया कीनीकर, डॉ थोरवट, आरबीएसके डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ ज्योती यन्नावार, डॉ अपर्णा जोशी, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, मनोज पांचाळ, अत्रिनंदन पांचाळ, जाहेद अलि, अधिपरिचारीका राजश्री ब्राम्हणे, जिजा भवरे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे,संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, अनिल गवळी, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, संगिता पंदीलवाड, सरस्वती दिवटे, सुरेश डुमलवाड, चरण आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.