नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

नांदेड (प्रतिनिधी) –  स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आशिष बोराटे व नरेंद्र राठोड यांनी केले होते. यासंदर्भातील माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!